गुरांचे कोंबून वाहतूक करणारे वाहन पकडले

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सहा गुरांना बोलेरो पिकअप वाहनातून कोंबून भरून वाहतूक करतांना विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी वाहन पकडल्याची घटना शहरातील पॉवर हाऊस नजीक घडली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी – पो.कॉ. स्वप्नील चव्हाण नेमणूक भडगाव पोलिस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भडगाव शहरातील पाचोरा रोडवर पॉवर ऑफिस जवळ पांढऱ्या रंगाची पिकअप क्र. एम.एच.०४ एफ.पी.१८४५ या गाडीत ६ गुरे वाहतूक करण्याचा परवाना नसताना अवैध रित्या दाटीवाटीने कोंबून कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असताना मिळाले. यामध्ये १ लाख ८५ हजार रुपयांचे ६ गोरे व २ लाख ५० हजार रुपयाची पिकअप गाडी असा एकूण  ४ लाख ३५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहा गुरांना गो शाळेत रवाना करण्यात आले आहे.

 

याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी  रईस खान सईद खान रा. कुर्बान नगर पाचोरा आणि शेख सईद शे. बुढण रा. बाहेरपुरा पाचोरा या दोघांविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पो.हे.कॉ. सचिन वाबळे हे करीत आहे.

Protected Content