गुप्ता यांच्या तक्रारीनंतर मनपा प्रशासनास जाग : मोजणीस प्रारंभ

जळगाव, प्रतिनिधी |  महानगर पालीकेच्या  नगररचना विभागातर्फे आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्ग लगतच्या सेवामार्गामधील मोजमापास प्रारंभ करण्यात आला आहे. या संदर्भात  सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, तापी महामंडळाचे कार्यकारी संचालक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.

 

आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्ग लगतच्या सेवामार्गामधील तापी पाटबंधारे महामंडळ विश्रामगृहाचे  कुंपणभिंतीचे अतिक्रमण काढण्यात  यावे अशी मागणी दीपककुमार गुप्ता यांनी केली आहे.  श्री. गुप्ता यांनी जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग लगत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यालयासमोर तापी पाटबंधारे महामंडळाचे विश्रामगृह असून सदर विश्रामगृहाचे दक्षिणेकडील भागाचे ६० मिटर रुंद राष्ट्रीय महामार्गाची हद्द आहे. सदर राष्ट्रीय महामार्गाचे हद्दीमधेच दोन्ही बाजूस ९ मिटर रुंद सेवामार्ग (सर्व्हिस  रोड) आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या उत्तरेकडील प्रस्तावीत ९ मिटर सेवामार्गामध्ये तापी पाटबंधारे महामंडळ विश्रामगृहाचे कुंपणभिंतीचे अतिक्रमण करणेत आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. भविष्यात जळगाव महानगरपालीकेकडून अथवा राष्ट्रीय महामार्गाकडून सेवामार्ग विकसीत करावयाचे झाल्यास तापी पाटबंधारे महामंडळ विश्रामगृहाचे कुंपणर्मितीचे अतिक्रमणामूळे सेवामार्ग विकसीतच होऊ शकत नाही. या  सेवामार्गाचा अंतर्भाव हा जळगाव शहराचे मंजूर विकास योजनेमध्ये दर्शविला आहे. या योजनेची अमलबजावणी करण्याची जबाबदारी सुध्दा महानगरपालीकेची असल्याचे निवेनात म्हटले होते. यानुसार आज महापालिकेच्या नगररचना विभागातर्फे मोजमापचे काम हाती घेण्यात आले आहे.

 

Protected Content