जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनचे उल्लंघन करून जप्त केलेला मुद्देमाल हा नाशिक येथे तपासणीसाठी रवाना करण्यात येणार असून जप्त केलेला मुद्देमालासह पोलीस कर्मचाऱ्या उद्या सकाळी ६ वाजता एलसीबीच्या कार्यालयाजवळ हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात वाहतूक बंद करण्यात आली होती. याकाळात दाखल गुन्ह्यातील जप्त केलेला मुद्देमाल हा नाशिक येथील सहाय्यक संचालक, प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पुढील तपासणी करीता प्रलंबित आहे. हा मुद्देमाल तपासणीसाठी रवाना करण्यासाठी एका शासकिय वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आपापल्या पोलीस ठाण्याकडील जो मुद्देमाल तपासणीसाठी काही मुद्देमाल बाकी असेल तर मुद्देमालाचे विवरण, कागदपत्र घेवून पोलीस स्टेशनमधील एका पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी. तसेच नाशिक येथे मुद्देमाल घेवून जाण्यासाठी ११ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ६ वाजत जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयाजवळ हजर रहावे असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी एका पत्राद्वारे कळविले आहे.