जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – गेल्या दोन वर्षापासून संसर्ग प्रादुर्भावामुळे सण उत्सवावर निर्बंध होते. यावर्षी एक महिन्यापासून बऱ्याच प्रमाणात संसर्ग निर्बंधात शिथिलता देण्यात आली असून यात्रा, समारोह, उत्सव आदी ठिकाणी निर्बंध हटविण्यात आल्याने गुढीपाडवा नववर्ष निमित्त बाजारपेठा गजबजल्या आहेत.
जिल्ह्यासह राज्यातच नव्हेतर देशपातळीवर गेल्या दोन वर्षापासून संसंर्ग प्रतिबंधात्मक नियम लागू होते. त्यांमुळे यात्रा, देवस्थाने, मंदिरे तसेच सार्वजनिक सण-उस्तावावर बरेच निर्बंध होते. यावर्षी गेल्या एक महिन्यापासून संसर्ग प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रतिबंधात्मक नियम हटविण्यात आले आहेत. उद्या गुढीपाडवा सण उत्सवानिमित्त पाडवा पहाट तसेच मराठी/ हिदुधर्मियांचे नववर्ष निमित्त बाजारपेठेत भेट वस्तू तसेच गुढीच्या कळसाला साखरेचे हार कंगणे, हार-गुच्छ, तोरणे आदि साहित्याची दुकाने सजली आहेत. पाडव्यानिमित्त अनेक संस्थाकडून सामाजिक उपक्रम, दिंड्या, स्वागतयात्रा, व्याख्यानमाला, पाडवा पहाट आदि कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
गुढीपाडवा, नववर्षनिमित्त बाजारपेठ गजबजली
3 years ago
No Comments