गुटखा व पानमसालाची वाहतूक करणारे वाहन पकडले !

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील करमाड परिसरात अवैधरित्या गुटखा व पानमसालाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर जामनेर पोलिसांनी कारवाई केली आहे. या ठिकाणी ६ लाख ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जामनेर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील करमाड येथील पाराचा चौक परिसरात (एमएच १९ सीझेड ५७६८) या वाहनांमध्ये बेकायदेशीररित्या तंबाखू व पानमसालाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ७ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता धडक कारवाई करत (एमएच १९ सीझेड ५७६८) या वाहनातून सुमारे ६ लाख ६३ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी माल जप्त करण्यात आला असून जामनेर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे यांच्या फिर्यादीवरून वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण शिंदे करीत आहे.

Protected Content