गुजरात व हिमाचल प्रदेशाच्या आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. गुजरात राज्यात आतापर्यतच्या ईतिहासत भाजपा ऐतिहासिक विजय प्राप्त केला असून तसेच हिमाचल प्रदेश सुद्धा विजयाच्या दिशेने वाटचाल असून या ऐतिहासिक विजयाचा आनंदोत्सव गुरूवार ८ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता बळीरामपेठ येथील भाजपा कार्यालय वसंतस्मृती येथे फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.
याप्रसंगी भाजपाचे दिपक सुर्यवंशी, भटके विमुक्ती आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख नवनाथ ढगे , माजी महापौर सीमा भोळे, सदाशिवराव ढेकळे, प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा उज्वला ताई बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, जिल्हा पदाधिकारी राजेंद्र मराठे, राहुल वाघ, ज्योती निंभोरे, मनोज भांडारकर, वंदनाताई पाटील, प्रकाश पंडित, राजेंद्र घुगे पाटील, किशोर चौधरी, महिला मोर्चा अध्यक्षा दिप्ती चिरमाडे, नगरसेविका गायत्री राणे, सुरेखा तायडे मंगला चौधरी, रेखा वर्मा, सरोज पाठक नंदिनी दर्जी, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, मिलिंद चौधरी, हर्षल चौधरी, अश्विन सैंदाणे, आघाडी अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, दिपक बाविस्कर, भूषण लाडवंजारी, गजानन वंजारी यांच्यासह आदी उपस्थित होते.