शिवरायांसोबत एकनाथ शिंदेंची तुलना : मंगलप्रभात लोढा वादात

सातारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याने मंत्री मंगलप्रभात लोढा हे वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत.

आज प्रतापगड येथे शिवप्रताप दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याला मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात बोलतांना राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची जीभ घसरल्याचे पहावयास मिळाले.

या कार्यक्रमात भाषणादरम्यान मंगलप्रभात लोढा म्हणाले, औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना आग्रा येथे डांबून ठेवलं होतं, पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनादेखील कोणीतरी डांबून ठेवलं होतं, पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले. या माध्यमातून त्यांनी एकनाथ शिंदे यांची थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केली. यामुळे आता प्रकरणी राजकीय वातावरण तापण्याचे संकेत मिळाले आहेत.

Protected Content