जळगाव: प्रतिनिधी । जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन कोरोना मुक्त झाल्यानतंर भाजपाच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालकडे काल बुधवारी रवाना झाले. एक महिना महाजन आता तेथे भाजपाच्या प्रचारासाठी थांबणार आहेत.
गिरीश महाजन यांना पश्चिम बंगाल येथिल निवडणुकीत प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे.
महाजन या आधीच पश्चिम बंगाल यथे प्रचारासाठी जाणार होते. मात्र, त्यांना कोरोना झाल्याने त्यांनी मुबंई येथे दहा दिवस उपचार घेतले. त्यानतंर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानतंर महाजन दोन दिवसांपूर्वीच जळगाव जिल्ह्यात आले होते. त्यांनी या दरम्यान त्यांनी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाहणी करुन उपाययोजनांचा आढवा घेतला. त्यानतंर त्यांनी पश्चिम बंगाल येथे निवडणुक प्रचारात जाण्याचा निर्णय घेतला.
पश्चिम बंगाल येथे जाण्यापूर्वी खबरदारी म्हणून गिरीश महाजन यांनी मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जावून चाचणी करुन घेतली होती. बुधवारी त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला. त्यानतंर गिरीश महाजन काल सायंकाळीच जळगावातून औरंगाबादमार्गे विमानाने भाजपाच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालकडे रवाना झाले आहेत.