जळगाव, प्रतिनिधी । ११२ देशातील १०० हून अधिक चित्रकारांनी एका तासात ११४९ चित्र साकारून फेसबुकवर अपलोड करून ‘गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड’ कायम केले आहे. यात मानव सेवा विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक सुनील दाभाडे यांनी देखील सहभाग घेतला होता. त्यांच्या या सहभागाबद्दल त्यांना आदिवासी पारधी महासंघातर्फे गौरविण्यात आले.
उपक्रमशील शिक्षक सुनील दाभाडे यांना गिनीज बुक ऑफ रेकॉर्डकडून नुकतेच सहभागाचे प्रमाणपत्र व गोल्ड मेडल प्राप्त झाले आहे. त्यंच्या या कार्याचा गौरव आदिवासी पारधी महासंघातर्फे एका छोटेखानी कार्यक्रमात शाल, श्रीफळ करण्यात आला. याप्रसंगी महासंघाचे जिल्हा सल्लागार पंडितराव सोनवणे, बाबूलाल खांदे, चुनीलाल सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष उखर्डू साळुंखे, पंडित रामा सोनवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता भिकन दाभाडे, लक्ष्मण राणे, राजेंद्र चव्हाण, शंकर माळी, रोशन साळुंखे, श्री. सपकाळे साहेब, सुकदेव मावळे, हरिदास साळुंखे आदींनी श्री. सुनील दाभाडे यांना शुभेच्छा दिल्यात.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/375196354181565