गावपातळीवरील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शिवसेना तत्पर –- जिल्हाप्रमुख महाजन

 वरणगाव प्रतीनीधी । भुसावळ तालुक्यातील प्रत्येक गावातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व शासकीय योजनांच्या लाभ  मिळवुन देण्यासाठी शिवसेना सर्वोतोपरी मदत करणार व लोकांना शिवसेनेने दिलेल्या वचनपुर्तीचा मान राखण्याचे काम जिल्ह्यातील शिवसेना करणार असल्याची माहिती दर्यापूर येथील शिवसंपर्क अभियानाच्या बैठकीत जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी दिली.

 

या शिवसंपर्क अभियानात जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक धिरज पाटील, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, अल्पसंख्याक आघाडीचे उपजिल्हा संघटक सईद मुल्ला, दर्यापूर माजी सरपंच सुनील कोळी, निलेश ठाकूर व शिवसैनिकांची उपस्थिती होती.

शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसैनिकांनी शासकीय योजनेचा लाभ गोरगरीब जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व अडीअडचणीमध्ये मदत करण्यासाठी एकत्रित संपर्कात राहून मदत करावी.  सर्व शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी संपर्कात राहावे यासाठी शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या परिसरातील शिवसैनिकांच्या संपर्कात राहून पक्षवाढ करण्यासाठी नियोजन करावे असे आवाहन  शिवसंपर्क अभियानाच्या बैठकीत उपजिल्हा संघटक विलास मुळे यांनी केले.  गावपातळीवरील निराधार लोकांना मदत, गाव विकास कामांसाठी लागणाऱ्या मदतीसाठीचे प्रस्ताव प्रत्येक शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांनी संबंधित सर्व कार्यालयात पाठविण्यासाठी पुढाकार घ्यावे व अडीअडचणी आल्या तर आमच्याशी संपर्क करा, त्यांना तात्काळ मदत करू असे आश्वासन विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे यांनी दिले.

Protected Content