गावठी हातभट्टीवर चाळीसगाव शहर पोलीसांचा छापा

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर चाळीसगाव शहर पोलीसांनी छापा टाकून हातभट्टी नष्ट करण्यात आली आहे. यात ६७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गावठी हातभट्टी सुरू असल्याची गोपनिय माहिती चाळीसगाव शहर पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी चाळीसगाव तालुक्यातील  टाकळी प्र.चा., पाटखडकी, वाघडु व पातोंडा शेतशिवारात अवैध गावठी हातभट्टीवर छापा टाकून दारू बनविण्याचे कच्चे रसायन नष्ट केले. तसेच दारू बनविण्याचे ६७ हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी

 

यांच्यावर गुन्हा दाखल

गोकुळ सदा भिल्ल रा. टाकळी प्र.चा. ता. चाळीसगांव, संतोष दामु सोनवणे रा. पाटखडकी ता.चाळीसगांव, प्रकाश गायकवाड रा. टाकळी प्र.चा. ता. चाळीसगांव, भाउसाहेब देवराम गायकवाड रा. पातोंडा ता. चाळीसगांव, बारकु खुशाल पाटील रा. वाघडु नवागांव ता. चाळीसगांव या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यांनी केली कारवाई

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे  सपोनि सागर ढिकले, सपोनि विशाल टकले, सपोनि सचिन कापडणीस, पोउपनि सुहास आव्हाड, पोहेकॉ अजय मालचे, पोहेकॉ रमेश पाटील, पोना  तुकाराम चव्हाण, पोना किशोर पाटील, पोना अमीत बाविस्कर, पोना राकेश पाटील, पोकॉ नरेंद्र चौधरी, पोकॉ समाधान पाटील, पोकॉ सुनिल निकम, पोकॉ ज्ञानेश्वर गिते, पोकॉ विनोद खैरनार, पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे, पोकॉ प्रविण जाधव, पोकॉ अमोल भोसले, पोकॉ  नंदकिशोर महाजन, पोकॉ महेंद्र सुर्यवंशी, पोकॉ विजय पाटील, पोकॉ शरद पाटील, पोकॉ चत्तरसिंग महेर, पोकॉ आशुतोष सोनवणे यांनी केली.

Protected Content