जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द, ममुराबाद, दापोरा गावासह गिरणा नदीच्या काठावर अवैधरित्या गावठी दारू विक्री व सुरू असलेल्या दारूभट्ट्या उध्दवस्थ करून एकुण २२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमालावर कारवाई करण्यात आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या दारूच्या भट्ट्या सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक तयार करून कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पथकाने सोमवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळपासून ते दुपारपर्यंत वेगवेगळ्या पाच ठिकाणी कारवाई करून एकुण ४ हजार रूपये किंमतीची ८६ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त केली. तर गिरणानदीच्या काठावरा दापोरा गावाजवळ सुरू असलेली दारूभट्टीवर कारवाई करून दारू बनिवण्याचे कच्चे व पक्के रसायन असे एकुण १८ हजार ५०० रूपये किंमतीचे रसायन नष्ट केले आहे. याप्रकरणी विजय अरूण अहिरे (वय-२६), भरत छन्नू सोनवणे (वय-४२), समाधान राजू महाले (वय-२३) तिघे रा. खेडीखुर्द ता. जळगाव, सुभाष गोमा कुंभार (वय-५२) रा. ममुराबाद जि.जळगाव आणि अशोक उर्फ काल्या सोनवणे यांच्याविरोधात जळगाव तालुका पोलीसात वेगवेगळे पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.