गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनांमागचे विज्ञान समजण्यासाठी आता देशपातळीवर परीक्षा

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । गाईचे कित्येक उपयोग आपल्याला आजही माहिती नाहीयेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आता राष्ट्रीय पातळीवर एक परीक्षा घेतली जाणार आहे. गाय आणि तिच्यापासून निर्माण करण्यात येणाऱ्या उत्पादनांमागे असलेल्या विज्ञानाची सर्वांना माहिती व्हावी हा यामगचा उद्देश आहे.

गाय हा अतिशय उपयुक्त पाळीव प्राणी असल्याचे नेहमीच म्हटले जाते. गाईचे दूध, गोमूत्र आणि इतर अनेक गोष्टी मानवी शरिराला अत्यंत उपयुक्त असल्याचे नेहमीच ऐकत आलो आहोत. मात्र गाईने दूध दिले नाही तरी ती उपयुक्त असते, हे कित्येकांना माहिती नाही. राष्ट्रीय कामधेनू आयोगाकडून ही परीक्षा घेतली जाणार आहे.

 

गे विज्ञान परीक्षा ही परीक्षा राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार आहे. या परीक्षेची घोषणा मंगळवारी करण्यात आली. राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथीरिया यांनी याबाबत माहिती दिली आहे. अशा प्रकारची परीक्षा देशात पहिल्यांदाच घेतली जात असून दरवर्षी ही परीक्षा घेतली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

कामधेनू आयोगाने सांगितल्या प्रमाणे ही ‘गो विज्ञान’ परीक्षा प्राईमरी आणि सेकंडरी विद्द्यालयाचे विद्यार्थी तसेच कॉलेजचे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. तसेच, सामान्य नागरिकदेखील या परीक्षेला पात्र आहेत. विशेष म्हणजे या परीक्षेसाठी कोणतीही फी देण्याची गरज नाही. या परीक्षेचे नाव ‘कामधेनू गौ विज्ञान प्रचार प्रसार परीक्षा’ असे आहे.

कामधेनू गौ विज्ञान प्रचार प्रसार परीक्षा ही पूर्णत: बहूपर्यायी असेल. परीक्षेचा सगळा अभ्यासक्रम कामधेनू आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. परीक्षार्थींना आयोगाकडून स्टडी मटेरियदेखील पुरवले जाईल.

राष्ट्रीय कामधेनू आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेमागे आयोगाचे अध्यक्ष कथीरिया यांनी सांगितल्याप्रमाणे युवक आणि अन्य नागरिकांच्या मनात गाईविषयी जागरुकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. या परीक्षेमुळे लोकांच्या मनात गाईविषयी उत्सुकता निर्माण होईल, असा दावा अथीरिया यांनी केला आहे. गाईने दूध देणं जरी बंद केलं तरी गाय हा अत्यंत उपयुक्त पशू आहे, अशी तसेच इतर जास्त माहीत नसलेली माहिती लोकांना या परीक्षेमुळे होईल.

दरम्यान, राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य बक्षिस आणि प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी आणि नागरिकांनी ही परीक्षा द्यावी असे आवाहन राष्ट्रीय कामधेनू आयोगाकडून केले जात आहे.

Protected Content