जळगाव प्रतिनिधी । भावाला शोधण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलाच्या अंगावर चार ते पाच जणांनी दारूच्या नशेत पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार शहरातील गांधी मार्केटमध्ये सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधत तक्रार देण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील भिलपूरा परिसरात राहणारा नवाज शेख अलाउद्दीन शेख (वय-१७) हा आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास लहान भावाला शोधण्यासाठी गांधी मार्केट परिसरात गेला. गांधी मार्केटमधील तिसऱ्या मजल्यावर काही चार ते पाच जण दारू पित होते. त्यावेळी नवाज हा त्याठिकाणी भावाला शोधण्यासाठी आला असता पाचही जणांनी दारूच्या नशेत नवाजचा हात पकडला. नवाजच्या खिश्यातील १५ रूपये हिसकावून घेतले व मारहाण करण्यास सुरूवात केली. यातून आपली सुटका होण्यासाठी नवाजने हात झटकण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तीन दारूड्यांनी नवाजला पकडले आणि एकाने अंगावर पेट्रोल टाकून पेटविण्यासाठी माचीस शोधत होता. त्यावेळी नवाजने हाताने जोरदार झाटका दिल्याने आपली सुटका करत घरी पळत गेला. नवाजन घरच्यांना आपबिती सांगितली. कुटुंबियांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून अज्ञात चार ते पाच जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
गांधी मार्केट ठरते दारू पिण्याचा अड्डा
गेल्या काही वर्षांपसून शहरातील गांधी मार्केटच्या तिसरा आणि चौथा मजला शनिवार आणि रविवारी दुकाने सहसा बंद राहतात. अशावेळी देशी दारू पिणाऱ्यांना दारू पिण्यासाठी गांधी मार्केटचा वापर करतात. याठिकणी मोठ्याप्रमणावर दारूच्या बाटल्या आणि प्लॉस्टी ग्लास पडलेली दिसून येते.