जळगाव प्रतिनिधी । शहरातील गवळीवाड्यात झालेल्या दगडफेकीत सातवा संशयित आरोपी , समिर हानिम काकर (वय-१९) सर्व रा. ताबापूरा याला एमआयडीसी पोलीसात अजिंठा चौफुलीवरून रविवारी २९ रोजी रात्री ९ वाजता अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आज सोमवारी ३० ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी केली आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील गवळीवाड्यात ११ सप्टेंबर २०२० रोजीच्या मध्यरात्री रवि हटकर यांच्या घरात संशयित आरोपी भोलासिंग जगदीशसिंग बावरी (वय-३२) रा. तांबापूरा हा घुसला. त्यावेळी रवी यांच्या घरात महिला ह्या एकट्याच होत्या. त्याला हटकले असता त्याने घरातून पळ काढला. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर रवी हटकर यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता जाब विचारला असता त्याचा राग आल्याने भोलासिंग जगदीशसिं बावरी, वडील जगदीशसिंग हरीसिंग बावरी (वय-५०), आई सतकौर जगदीशसिंग बावरी (वय-४५), मोहनसिंग उर्फ मोनूसिंग जगदीशसिंग बावरी आणि भाऊ सोनूसिंग जगदीशसिंग बावरी, समिर हानिम काकर (वय-१९) सर्व रा. ताबापूरा हे सर्वजण गवळीवाड्यात चालून आले. त्यांनी हटकर यांच्या घरावर दगडफेक केली. यात भोलासिंग जगदीशसिंग बावरी, सोनूसिंग जगदीशसिंग बावरी, जगदीशसिंग हरीसिंग बावरी, रिझवान गायासोद्दिन शेख, मोनुसिंग जगदीशसिंग बावरी, मोहनसिंग जगदीशसिंग बावरी यांना यापुर्वी या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. यातील संशयित आरोपी समिर काकर हा ११ महिन्यांपासून फरार होता.
समीर काकर हा जळगाव शहरात आला असल्याची गुप्त माहिती पो.नि. प्रताप शिकारे यांना मिळाल्यानंतर सहायक फौजदार अतुल वंजारी, इमरान सैय्यद, मुदस्सर काझी, गोविंदा पाटील, सचिन पाटील यांनी समीर काकरला रविवारी २९ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता अजिंठा चौफुली येथून ताब्यात घेत अटक केली. त्याच्यावर घरफोडीचे चार गुन्हे दाखल आहेत. अटकेतील समीर काकर याला आज सोमवारी ३० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता न्या. ए.एस.शेख यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयीन कामकाजाच्या वेळी सरकारतर्फे अॅड. प्रिया मेढे यांनी कामकाज पाहिले.