जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शनीपेठ परिसरातील गवळीवाडा परिसरात राहणारा ४० वर्षीय तरूण घरात कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
संतोष हरी वाणी ( वय 40 ) रा. गवळी वाडा, शनीपेठ, जळगाव असे हरविलेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील शनीपेठ परिसरातील गवळी वाड्यात संतोष हरी वाणी (वय-40) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. तो गतिमंद असून 12 ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरात कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला आहे. त्यांच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही आढळून आला नाही अखरे रविवारी १६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यांच्या खबरीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक इंदल जाधव करीत आहे.