गरुड महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे ऑनलाईन वेबिनार

 

शेंदुर्णी, प्रतिनिधी । येथील अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि NIIT यांच्या संयुक्त विद्यमाने गरुड महाविद्यालयात वाणिज्य विभागा अंतर्गतऑनलाइन वेबिनारचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये बँकिंग क्षेत्रातील करियर आणि संधी यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि करिअरच्या संदर्भात खूप मोठ्या समस्या असतानाही बँकिंग क्षेत्रात असणाऱ्या संधी सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी महाविद्यालयाने NIIT सोबत हा पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय भोळे यांनी बँकिंग क्षेत्राची आजची गरज विद्यार्थ्यांसमोर विशद करून केले. कार्यक्रमाच्या समन्वयिका योगिता चौधरी यांनी प्रास्ताविक केले.

NIIT मधून BFSI, IFSI, प्रशिक्षणाचा अनुभव असलेले निरंजन मोहिते तसेच श्री. नारायण हे कार्यक्रमातील प्रमुख मार्गदर्शक होते. त्यांनी खाजगी क्षेत्र व सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग क्षेत्रात असलेल्या संधी’ आवश्यक पात्रता , तयारी कशी करावी यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच तृतीय वर्षाला असणारे विद्यार्थी त्याचप्रमाणे पदवीप्राप्त विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस आयोजनाच्या संदर्भातील मानसही त्यांनी व्यक्त केला. आभार प्रा. डॉ. सुजाता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शिवम सिंग मुंबई यांनी केले. या ऑनलाइन वेबिनार साठी १६० विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमांमध्ये प्रा.डॉ. रश्मी शर्मा – भुसावळ, प्रा.डॉ. गोपाल कोल्हे, फैजपूर, प्रा. डॉ. रत्नपारखी यांचेही सहकार्य लाभले. कार्यक्रमास प्रा. डॉ. श्याम साळुंखे (वाणिज्य विभाग प्रमुख), प्रा . डॉ.प्रशांत देशमुख, प्रा. डॉ. अमर जावळे,प्रा .डॉ. आर डी गवारे,प्रा डॉ. वसंत पतंगे, प्रा डॉ.ए.एन.जीवरग, प्रा .धम्मा धारगावे, प्रा डॉ महेश पाटील, प्रा.आप्पा महाजन, प्रा.प्रमोद सोनवणे,प्रा. रीना गरुड,. प्रा.वर्षा निकम, प्रा.सुरेखा निकम, निलेश बारी, प्रा. मोहिनी गुजर’प्रा. वर्षा पवार, प्रा.द्राक्क्षे, प्रा. राहुल गरुड आणि इतर प्राध्यापक उपस्थित होते.

या ऑनलाइन वेबिनारसाठी संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड, सचिव सागरमल जैन, सहसचिव दिपक गरुड, ज्येष्ठ संचालक यु. यू. पाटील, संस्थाध्यक्ष प्रतिनिधी संजय देशमुख , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव पाटील यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

Protected Content