जळगाव, प्रतिनिधी । शासनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या सहकार्याने आर्सैनिक अल्बम-३० ह्या होमिओपॅथिक गोळ्यांची मोफत वाटप युवा सामाजिक कार्यकर्ते ललित उर्फ बंटी शर्मा हे करीत आहेत.
शहरातील अनेक ठिकाणी जीवाची पर्वा न करता सामाजिक बांधीलकी व चळवळ म्हणून सुरू ठेवली आहे . गेल्या दोन- अडीच महिन्यांपासून सातत्याने कार्य सुरू आहे असे ललित उर्फ बंटी शर्मा यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज ‘ ला बोलताना सांगितले. आजपर्यंत शेकडो गरजूंनी याचा लाभ घेतला आहे तसेच अत्यंत गरिबांना जेवणाचीही सहकार्य केले आहे आणि करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. समाज काहीही म्हणो , की वेडा म्हणो मी त्याकडे दुर्लक्ष करीत असतो आणि निस्वार्थपणे कार्य करीत असतो असे ते म्हणाले. माझ्यासोबत पारीख शर्मा याचेही सहकार्य असते. सकाळी घराबाहेर पडून संध्याकाळीच घराकडे वळतो असे त्यांनी सांगितले.