नवी दिल्ली वृत्तसंस्था । करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. या पार्श्वभूमीमवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक पॅकेजची घोषणा पत्रकार परिषदेत केली. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गरिबाला पुढील तीन महिने प्रत्येकी पाच किलो तांदूळ किंवा गहू मोफत दिले जाणार आहे.त्यासोबतच एक किलो डाळ दिली जाणार आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्याचा मोठा फटका गरीब, मजूर आणि इतर घटकांना बसणार आहे. मात्र, केंद्र सरकारनं या वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत लाभार्थींना आधीच पाच किलो तांदूळ किंवा गहू दिले जात आहेत. त्यात आता पुढील तीन महिन्यांसाठी मोफत गहू किंवा तांदूळ मोफत दिले जाणार आहे. याशिवाय एक किलो डाळही मोफत दिली जाणार आहे. या योजनेचा ८० हजार गरिबांना लाभ मिळणार आहे.