जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नुकत्याच पार पडलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवातील सर्वोत्कृष्ट आरास व विसर्जन मिरवणूक आरास स्पर्धेतील विजेत्या गणेश मंडळांना पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे शुक्रवारी १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता घेण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंता, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, पीपल बँकेचे चेअरमन अभिषेक पाटील, ओकारेश्वर मंदीर संस्थेचे जोशी, केसीई सोयायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्यासह गणेश मंडळाचे प्रमुख सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री गणेश स्थापना आरास स्पर्धेत प्रथम विजेते आझाद क्रीडा व सांस्कृतीक मित्र मंडळ, बळीरामपेठ, द्वितीय विजेते एम.जी.रोड गणेश मंडळ, नवीपेठ, तृतीय विजेते युवा शक्ती मित्र मंडळ, काव्यरत्नावली चौक तर उत्तेजनार्थ विजेते जय गणेश मंडळ, स्टेशन रोड आणि जिद्दी मित्र मंडळ रथ चौका यांचा समावेश आहे. श्री गणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धेत प्रथम क्रमांक जुने जळगाव मित्र मंडळ, द्वितीय महर्षी वाल्मिक मित्र मंडळ जैनाबाद, तृतीय युवा मारूतीपेठ मित्र मंडळ, मारूतीपेठ, तर उत्तेजणार्थ वीर बाजीप्रभू मित्र मंडळ, रथ चौक आणि बाबा सेवादास गणेश मंडळ शनीपेठ यांचा समावेश आहे. यावेळी जैन इरिगेशनचे अनिल जोशी यांचा सत्कार करण्यात आला. आरास स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, हिरिशचंद्र सोनवणे, मुकुंद मेटकर, सुनिल दाभाडे, विशाल मोरे तर विसर्जन मिरवणूकीत परिक्षक म्हणून सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंता, दिपक जोशी, हरिशचंद्र सोनवणे, सुनिल दाभाडे यांनी काम पाहिले.