गडाख विखे निकाल सुप्रीम कोर्टात सादर करणार – माजी आमदार जगदीश वळवी (व्हिडीओ)

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  देशात अनेकदा आमदार अपात्र झाल्यानंतर दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवणार्‍या उमेदवाराला विजयी घोषीत करण्यात आले आहे. यानुसार मला विजयी घोषीत करा अशी मागणी माजी आमदार जगदीश वळवी यांनी  पत्रकार परिषदेत केली.

 

माजी आमदार जगदीश वळवी यांनी सांगितले की,  याआधी देशात अनेकदा आमदार अपात्र झाल्यानंतर दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवणार्‍या उमेदवाराला विजयी घोषीत करण्यात आले आहे. याचे पुरावे देखील आहेत. यामुळे आमदार लताताई सोनवणे यांची जात प्रमाणपत्र प्रकरणी याचिका फेटाळून लावल्याने दुसर्‍या क्रमांकाची मते आपण घेतलेली असल्याने आपल्याला विजयी घोषीत करण्यात यावे अशी मागणी केली  आहे.

 

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा सर्वत्र स्वागत होत आहे. मला अनेकांनी भ्रमणध्वनी व प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी  बाळासाहेब विखे पाटील विरुद्ध यशवंतराव  गडाख  यांचा गाजलेला खटला आहे. यात गडाख यांना दोषी ठरवून त्यांची निवड अवैध ठरवली व विखेंना विजयी घोषित केले. यशवंतराव गडाख हे  विजयी झाले होते.  त्यांना बाळासाहेब विखे यांनी आव्हान दिले होते. आणि त्यांची निवडणूक न्यायालयाने रद्द केली होती. ती रद्द केल्यानंतर जो दुसरा क्रमांकाचे बाळासाहेब विखे यांना विजयी घोषित करण्यात आले होते. हा निकाल मी सुप्रीम कोर्टात सादर करणार असल्याचे श्री. वाळवी यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या क्रमाकाच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्याची कायद्यांमध्ये तरतूद असल्याचे ही पुढे सांगितले.  याबाबत आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

देशात सुप्रीम कोर्ट सर्वाच्च असून या व्यतिरिक्त दुसरे कोणते कोर्ट नसल्याचे सांगत असे कोणते कोर्ट असेल तर मला त्याची माहिती नसल्याचे कोपरखळी लगवली. शिंदे गटाला एक आमदार कमी झाल्याने काही फरक पडणार नसल्याचे त्यांनी प्रांजळ मत मांडले.

 

Protected Content