आमदार चंद्रकांत पाटलांनी घेतली बोदवड येथील लहान रॅन्चोची भेट

बोदवड – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आज मतदारसंघातील बोदवड ता. बोदवड येथील विद्यार्थी अयाज अस्लम पिंजारी ह्याने तयार केलेल्या स्वयंचलित रोबोटची प्रात्यक्षिकासह मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली.

प्रसंगी विद्यार्थ्याने बनविलेल्या रोबोट संबंधी तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कृती विषयी विद्यार्थ्याचे कौतुक केले आणि सत्कार करत शुभेच्छा दिल्या.

प्रसंगी नगराध्यक्ष आनंदा पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुख कलीम शेख, नगरसेवक हाजी सईद बागवान, नगरसेवक दिनेश माळी, नगरसेवक हर्षल बडगुजर, नगरसेवक राजेश नानवाणी, तालुका संघटक शांताराम कोळी, नगरसेवक सुनील बोरसे, नगरसेवक निलेश माळी, नगरसेवक पप्पू चव्हाण, नगरसेवक गोलू बर्डिया, शहर प्रमुख राहुल शर्मा, अल्पसंख्यांक शहर प्रमुख ग्रामपंचायत सदस्य दीपक माळी, अल्पसंख्यांक शहर प्रमुख अप्पू भांजा तऊसिफ, महेंद्र मोंढाळे, पिंजारी, अजय राजपूत ,भास्कर गुलछड, योगेश वैदे, शरीफ मन्यार, सोहेल शेख, मुस्ताक पिंजारी, गुलाब ठेकेदार व सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content