गंभीर गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला अटक !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील अट्टल गुन्हेगाराराला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर अमळनेर पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

रामजाने उर्फ राहुल पंढरीनाथ पाटील (वय-२५) रा. बंगाली फाईल, अमळनेर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

या संदर्भात अधिक असे की, २० डिसेंबर मध्यरात्री साडेबारा वयाच्या सुमारास अमळनेर शहरातील रेल्वे स्टेशनवर सचिन पाटील (वय-22) राहणार शिवशक्ती चौक याला गुन्हेगार राहूल पाटील याने चाकूने वार करून मोबाईल हिसकावून नेल्याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच नंदुरबार रेल्वे पोलीस स्टेशनला जीवेठार मारण्याची धमकी आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. याला अमळनेर पोलिसांनी त्याच्या घराच्या परिसरातून अटक केली आहे. त्याच्यावर जबरी चोरी, लुटमार, सरकारी कामात अडथळा, खंडणी, जीवेठार मारण्याची धमकी तसेच चाकूचा धाक दाखवून रेल्वेतील तृतीयपंथी यांच्याकडून हप्ता वसुली करण्याचे विविध गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पोहेकॉ सुनील हटकर, किशोर पाटील, पोलीस नाईक रवींद्र पाटील, शरद पाटील, दीपक माळी यांच्यासह आदींनी केली आहे.

Protected Content