जळगाव प्रतिनिधी । शहरातील खोटे नगरात दोन पान टपरी फोडून रोकडसह ऐवज लांबविणाऱ्या दोघांना काल सोमवारी सायंकाळी एलसीबीने राहत्या घरातून अटक केली होती. आज मंगळवारी दुपारी दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे. दोघांवर तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरज संजय सपकाळे (वय-२१) आणि श्याम सोपान कळस्कर (वय-२१) दोन्ही रा. समता नगर अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे. अधिक माहिती अशी की, शहरातील खोटे नगरातील रिक्षा स्टॉप जवळ आलेल्या पानची टपारी ३१ एप्रिल रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडली होती. या गुन्ह्यातील आरोपी हे शहरातील समता नगरात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली त्यानुसार सहाय्यक फौजदार अशोक महाजन, पोहेकॉ दादाभाऊ पाटील, प्रदीप पाटील, जयंत पाटील, पोलीस नाईक नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, पोकॉ. सचिन महाजन आणि चालक अशोक पाटील यांनी काल सोमवारी सांयकाळी सापळा रचून संशयित आरोपी भरज संजय सपकाळे (वय-२१) आणि श्याम सोपान कळस्कर (वय-२१) दोन्ही रा. समता नगर यांना अटक होती. दोघांनी खोटे नगरात दोन पान टपरी फोडल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल आणि रोख रूपये हस्तगत करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी दोन्ही संशयितांना तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आज दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय दुसाने करीत आहे.