खॉजामिया चौकातून विद्यार्थ्याच्या हातातील मोबाईल दोघांनी सिनेस्टाईल लांबविला; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । दुचाकीने पायी जात असलेल्या विद्यार्थ्याच्या हातातून ६ हजार रूपये किंमतीचा मोबाईल दुचाकीवरील दोन भामट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटना गणेश कॉलनी रिंगरोड जवळ शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, धर्मेश कैलास कुंभार (वय-१७) रा. कडगाव ता.जि.जळगाव ह.मु. फॉरेस्ट कॉलनी हा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. फॉरेस्ट कॉलनीत राहणाऱ्या आत्याकडे राहतो. सध्या कॉलेज बंद असल्यामुळे त्याचे खासगी क्लासेस सुरू आहे. नेहमीप्रमाणे २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी क्लास घरी जात असतांना रिंगरोडवरील गणेश कॉलनी खॉजामियाजवळील गोकुळ स्वीटमार्ट जवळ आला. उशीरा घरी यईल म्हणून आत्याला फोन लावत असतांना मागून अज्ञात दोन जणांनी दुचाकीवरून येवून हातातील ६ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळून गेले. काही समजण्याच्या आता दोघे चोरटे दुचाकीवरून फरार झाले. धर्मेश कुंभार याच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि प्रदीप चंदेलकर करीत आहे. 

Protected Content