जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील खेडी बु येथील २२ वर्षीय तरुणाला चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी चार जणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील खेडी बु येथील दीपक एकनाथ सोनवणे याचा विवाह नशिराबाद येथील छोटू हिरामण सोनवणे यांच्या भाचीसोबत ठरला होता. मात्र काही कारणास्तव हा विवाह रद्द झाला होता. बुधवार ६ रोजी दीपक हा घराजवळ स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करीत असल्याने पप्पू रमेश पवार, सुलतान रमेश पवार दोघ. रा. असोदा व छोटू हिरामण सोनवणे, दीपक अर्जुन सोनवणे दोघ रा. नशिराबाद यांनी खेडी बु येथे येवून दीपक यास बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यात लोखंडी पाईप मारुन त्याला गंभीर जखमी केले. दीपक याच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संजय भोई हे करीत आहे.