यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील डोंगर कठोरा येथील रहिवाशी रवींद्र पाटील यांची मुलगी व जे.टी.महाजन इंग्लिश मेडीयम स्कुल फैजपूर या शाळेत ९ वी च्या वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी खुशबु पाटील या विद्यार्थिनीने आंतरराष्ट्रीय हॅन्डरायटिंग स्पर्धेत घवघवीत यश मिळविले आहे.
सदरील विद्यार्थिनीच्या यशाबद्दल तिची राष्ट्रीय हॅन्डरायटिंग स्पर्धेकरीता नुकतीच निवड करण्यात आली आहे.या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील रहिवाशी रवींद्र मुरलीधर पाटील यांची मुलगी हि जे.टी.महाजन इंग्लिश मेडीयम स्कुल फैजपूर येथील शाळेत ९ वीच्या वर्गात शिकत आहे.यात नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय हॅन्डरायटिंग स्पर्धेत खुशबु पाटील हिने सदरील परीक्षा पास करून घवघवीत यश संपादन केले आहे. या यशामुळे या विद्यार्थिनींची राष्ट्रीय हॅन्डरायटिंग स्पर्धेकरीता नुकतीच निवड करण्यात आली आहे. या यशात तिचे वडील रवींद्र मुरलीधर पाटील, आई जयश्री पाटील, चित्रकला शिक्षक वैशाली मॅडम, वर्गशिक्षक अतुल गोराळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
खुशबु पाटील यांच्या यशाबद्दल जे.टी.महाजन इंग्लिश मेडीयम स्कुल फैजपूर प्रिन्सिपाल मोसेस पी.जाधव, सुपरवायझर पूनम नेहते, शिक्षक विश्वजय राजपूत, तृप्ती सोनवणे, स्वाती परदेशी, मनीषा ढाके, शीतल मॅडम, राजश्री मगरे, दीपाली मॅडम, हेमंत शिंदे यांचे देखील बहुमोल सहकार्य लाभले.
खुशबु पाटील यांच्या यशाबद्दल या.अ.ध.चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन झांबरे, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डी.जी.भोळे, जि.प.मराठी शाळेचे मुख्याध्यापक विजया पाटील, उपशिक्षक शेखर तडवी, डॉ. केतन झांबरे, बंटी बढे, निलेश बढे, निलेश इंगळे, हितेश झांबरे, मोहन पाटील, नरेंद्र महाजन, राकेश चौधरी, ह.भ.प.दिनकर पाटील महाराज, ह.भ.प.दत्तात्रय गुरव महाराज, ह.भ.प.शालिक झोपे महाराज यांनी अभिनंदन केले आहे.