मुंबई (वृत्तसंस्था) दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. याबाबतचे धोरण लवकरच आणण्यात येईल, अशी घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत विधानपरिषदेत केली आहे.
डॉ. नितीन राऊत यांनी विधान परिषदेत सांगितले की, घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज देण्यासाठी एक समिती अभ्यास करत आहे. त्यानुसार १०० युनिटपर्यंत वीज मोफत देणे, शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी चार तास वीज देण्याचे प्रस्तावित असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधान परिषदेत लक्षवेधीवर केले. विद्युत निर्मिती केंद्रातील होणारी गळती त्याचप्रमाणे वीज वितरणातील गळती कमी करून वीज दर आटोक्यात आणण्यासाठी येत्या तीन महिन्यात तोडगा काढून वीज दर कमी करता येईल का, तसेच शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देता येईल का याची पडताळणी करून निर्णय घेतला जाईल,असेही राऊत यांनी सांगीतले.