रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील खिर्डी परिसरात कोरोना महामारीत जिवाची परवा न करता काम करणाऱ्या स्वयंसेवक तसेच प्रशासकिय कोरोना योध्द्यांचा प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
रावेर तालुक्यातील खिर्डी परिसरात कोरोना महामारीमध्ये गरजु कुटुंबा मदत तर कोरोना रुग्णाना सहकार्य करणाऱ्या सामाजिक संस्था तसेच तत्पर फाऊंडेशनतर्फे काम केलेल्या कोरोना योद्धाचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे, रावेर कृउबा समिती सभापती श्रीकांत महाजन, निभोंरा पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकर, सपोनि योगेश शिंदे, आरोग्य अधिकारी चंदन पाटिल, शिवसेना नेते अफसर खान, छोटू पाटील आदी उपस्थित होते. यावेळी तत्पर फांऊंडेशनतर्फे मंडळाधिकारी, खिर्डी परिसरातील तलाठी, पोलिस पाटिल, ग्रामविकास अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, आशा वर्कर, आरोग्यसेविका, महावितरण कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी, सफाई कामगार आदी कोरोना योद्धाचा सत्कार केला.