अमळनेर, प्रतिनिधी | लोकनेते तथा खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राजमुद्रा फाऊंडेशन संचलित लोकनेते शरदचंद्र पवार अभ्यासिकेच्या वतीने अमळनेर येथे निबंध लेखन स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे.
अमळनेर येथे खा.शरदचंद्र पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी शरदचंद्रजी पवार व त्यांचे कार्य याविषयावर स्पर्धा घेण्यात आली. दरम्यान १ ली ते १० वी गटात ३ बक्षिसे, ११ वी ते खुला गटात ३ बक्षिसे दिली जाणार आहेत. निबंध कमीत कमी ३०० शब्दात असणे अपेक्षित असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. तत्पूर्वी स्पर्धकांनी निबंध हे १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजे पर्यंत जमा करावयाचा आहे. अधिक माहितीसाठी खालील संपर्क नंबर अक्षय पाटील ७०२०२४७१५५ फोर्ट्स , ढेकू रोड , अमळनेर साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा हि श्याम जयवंतराव पाटील जिल्हाध्यक्ष म.से.स.संभाजी ब्रिगेड , अध्यक्ष राजमुद्रा फाऊंडेशन व आरोग्य सभापती अमळनेर यांच्यासंकल्पनेतून होत आहे.