सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । खासदार रक्षाताई खडसे यांच्यातर्फे आपत्कालीन सेवा प्रदान करणार्यांना मास्क वाटप करण्यात आले.
रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यातर्फे आपत्कालीन सेवा देणार्यांना मास्क वाटप करण्यात आले. यात सावदा नगरपालिका, सावदा पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय सावदा, शहर पत्रकार संघ, किसान सहकारी दूध उत्पादक संस्था सावदा, सावदा सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित सावदा, विद्युत वितरण कंपनी सावदा,विविध राष्ट्रीयीकृत व सहकारी बँका येथे अविरत सेवा देणार्या कर्मचार्यांना मास्क उपलब्ध करून दिले. याप्रसंगी गटनेते नगरसेवक अजय भारंबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पंकज येवले, नगरसेवक विश्वास, सावदा शहराध्यक्ष पराग पाटील, गजानन भार्गव, महेश अकोले यांची उपस्थिती होती.