खासदार बाळुभाऊ धनोरकर यांची सानंदा निकेतन येथे सदिच्छा भेट

 

खामगाव, प्रतिनिधी । चंद्रपुर लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळुभाऊ धानोरकर यांनी मा.आमदार राणादिलीपकुमार सानंदा यांच्या निवासस्थानी शनिवारी २३ जानेवारी रोजी सदिच्छा भेट दिली.

मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी त्यांचा शाल व पुष्पहार घालुन स्वागत केले. यावेळी उद्योगपती राणा गोकुलचंदजी सानंदा, माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा, राणा सागरकुमार सानंदा, राणा दिग्वीजयसिंह सानंदा, लक्ष्मणदास आयलाणी, पिंटुभाउ जाधव, प्रमोद मगरे, संजय सपाट यांची उपस्थिती होती. यावेळी खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. राणा दिलीपकुमार सानंदा हे अंत्यत चांगले व्यक्तीमत्व असून या क्षेत्राचा विकास करण्यासाठी ते नेहमी झटत असतात. भविष्यात जनतेने त्यांच्या पाठीशी राहावे असे आवाहन करीत खा.बाळुभाऊ धानोरकर यांनी मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व जर कॉंग्रेस हायकमांडने आदेश दिले तर मी वाराणसीत जाऊन पंतप्रधान मोदींविरुध्द निवडणुक लढेल असे त्यांनी सांगितले.

Protected Content