पुणे लाईव्ह ट्रेंडस न्युज, वृत्तसेवा | भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. तर खासदार भोसले यांनी साताऱ्यातील विकास कामांविषयी चर्चा केल्याचे स्पष्ट केले आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी या राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमागील कारण स्पष्ट करतांना सांगितलं की, ‘साताऱ्यातील विकास कामांविषयी आपली अजित पवारांशी चर्चा झाली. विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात अजित पवारांना विनंती केली. पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का? अशी विचारणा केली असता उदयनराजे भोसलेंनी दिलेलं उत्तर अनेक तर्क-वितर्कांना उधाण देणारं ठरलं आहे. या प्रश्नानंतर काही सेकंदांचं मौन धरल्यानंतर त्यांनी उत्तर दिलं की, शिवाजी महाराजांचं जसं सर्वधर्म समभाव हे धोरण होतं, तसंच माझंही धोरण सर्व पक्षीय समभाव असं आहे, असं उदयनराजे म्हणाले.