खामगाव प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयात १९ फेब्रुवारी रोजी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
सर्वप्रथम तहसीलदार डॉ. शितलकुमार रसाळ यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तहसीलदार रसाळ यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी नायब तहसीलदार विजय चव्हाण, नायब तहसीलदार भारत किटे, माहिती कार्यालयाचे जयंत वानखडे, मंडळ अधिकारी सूर्यकांत सातपुते, मंडळ अधिकारी व्ही.एस. खेडेकर, लिपिक सी.जी. मुळीक, एस.बी. ठाकरे, शिपाई राहुल तायडे, एसडीओ कार्यालयाचे दीपक लोखंडे, शासकीय रुग्णालयाचे संजय लांडगे यांच्यासह इतर उपस्थित होते.