जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पोलीस मुख्यालयातील पोलीस जलतरण तलाव येथे जळगाव जिल्हा स्विमिंग असोसिएशनच्या वतीने झालेल्या खान्देश स्विमींग स्पर्धेत जळगावचा संघ विजयी ठरला आहे.
जळगाव शहरातील पोलीस मुख्यालयातील पोलीस जलतरण तलाव येथे जळगाव जिल्हा स्विमिंग असोसिएशनच्या वतीने शनिवारी ३१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता खान्देश स्विमींग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्याने आपले ९३ जलतरणपटूसह सहभाग नोंदवला होता. खान्देश स्विमिंग चॅम्पियनशिप जळगाव संघाने मिळवली उपविजेपद अहमदनगर संघाला मिळाले तृतीय स्थानी औरंगाबाद संघ राहिला. या स्पर्धेचे बक्षीस समारंभ सेवा निवृत्त शल्यचिकित्सक डॉ. उदयसिंग पाटील, जळगाव जिल्हा स्विमिंग असोसिएशनच्या अध्यक्षा रेवती नगरकर, उपाध्यक्ष राजेंद्र ओक, सचिव फारुख शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
यात कृष्ण साळवे, वृषाली बडगुजर, वाल्मिक कुळकर्णी, अन्वी चौधरी, आर्यन सोनार, निधी पाटील, ओम चौधरी यांचा समावेश होता. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सुरज दायमा, खाटीक सर ,संदीप पाटील, किरण पाटील प्रतीक काळे व कमलेश नगरकर यांनी परिश्रम घेतले.