रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील खानापूर येथील तोल काट्यानजीक असणार्या शेताला लागलेल्या आगीत शेतकर्याचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील खानापूर येथे बुर्हाणपूर रोड वरील कुमार नरवाडे याच्या गांगलाक्ष तोल शेजारील गव्हाच्या शेतात शेतकर्याने कचरा पेटवत असतानाच अचानक आग लागली. आगीत गुरांचा कडबा, लाकूड, जुने दरवाजे-खिडक्या, मांडपचे बाकडे, फायबर खुर्च्या, मंडपाचे गेट या वस्तू जळून खाक झाल्या. तर शेजारील निंबाचे झाड देखील जळाले. रावेर येथील अग्नीशमन पथकाने आग आटोक्यात आणली.
दरम्यान, घटना स्थळावर सुमारे ५०० क्विंटल मकयाचे पोते भरलेले होते. शेजारीच कुमार नरवाडे याच्या मालकीचे मोठे डिझेल जनरेटर, अल्टो कार, बीट कार, छोटा हाथी अशी वाहने होती. सुदैवाने ती वाहने गावकर्यांच्या मदतीने वाचविण्यात आले. महसूल विभागाने नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००