जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय मुलाचे अपहरण केल्याची घटन समोर आली आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की जळगाव तालुक्यातील खादगाव येथे गौरवर अरविंद भोई (वय-१५) हा मुलगा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता गौरव हा घरी असतांना त्याला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचे समोर आले आहे. मुलाच्या नातेवाईकाने त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतु मुलगा कुठेही न मिळून आल्याने अखेर त्यांनी मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन खबर दिली. त्यांच्या खबरीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक मोहिते करीत आहे.