मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईमधून १०० हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बेपत्ता झाले आहेत. रुग्णांनी चुकीची माहिती त्यांना दिल्याने शोधणे कठीण झाले आहे.
‘मुंबई मिरर’च्या वृत्तानुसार मुंबईमधून १०० हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गायब झाले आहेत. त्यांनी चुकीची माहिती दिल्याने शोधणे कठीण झाले आहे. विक्रोळीच्या एन वॉर्डमध्ये कोरोनाचे १२ रुग्ण बेपत्ता झाले आहेत. तर अंधेरी पूर्वमध्ये २७ जण बेपत्ता झाले आहेत. अधिकारी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. खासगी लॅबमधील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. धारावीमध्ये तर २९ जण बेपत्ता झाले आहेत. मात्र, यापैकी काही जणांना शोधण्यात यश आले आहे. दुसरीकडे बांद्र्याच्या एका कंपनीने कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली होती. मात्र, पत्ता देताना बांद्रा पूर्व असा उल्लेख केला होता. परंतू ही कंपनी पश्चिमेची होती.