Home क्राईम खळबळजनक : महिलेला घरात घुसून जिवंत पेटवले

खळबळजनक : महिलेला घरात घुसून जिवंत पेटवले


Rape Burnt Case
 

औरंगाबाद (वृत्तसंस्था) सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात एका विकृताने घरात घुसून महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत पेटवल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान आरोपीने महिलेला का पेटवले यामागचे कारण अदयाप समजू शकले नाही.

 

औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात मंगळवारी रात्री आरोपी महिलेच्या घरात घुसला. ‘घरात का आला?, माझी बदनामी होते’, असा जाब या महिलेने विचारल्यानंतर वाद विकोपाला पोहोचला. यानंतर आरोपीने रॉकेल महिलेच्या अंगावर ओतून पेटवून दिले. या घटनेत महिला ९५ टक्के भाजली आहे. या प्रकरणी आरोपी संतोष मोहितेला अटक करण्यात आली आहे. आरोपी संतोष गावात बिअरबार चालवतो.


Protected Content

Play sound