किनगाव येथील मारूती मंदीरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली

yawal news 2

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव गावातील असलेल्या मारुती मंदिराची दानपेटी कोणीतरी अज्ञात चोरटयाने फोडली असल्याची घटना घडली. घटनास्थळ यावल पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी धाव घेतली.

या संदर्भात वृत असे की, आज ५ फेब्रुवारी २०२० रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी किनगाव गावातील मध्यभागात असलेल्या मारूतीच्या मंदीरामधील दानपेटी फोडुन त्यातील भाविकांनी टाकलेली दानाची रक्कम अज्ञात चोरटे घेवुन पसार झाल्याची घटना घडली आहे. या दानपेटीत किती रक्कम होती याची माहीती मिळु शकली नाही, घटनेची माहीती मिळताच पो. नि. धनवडे हे तात्काळ सदर घटनेच्या ठिकाण हजर झालो असुन, सदरच्या घटनेची सखोल चौकशी करून पुढील कारवाई करीत आहोत. मारूती मंदीराची दानपेटी फोडल्याची खबर गावात पसरताच मंदीराच्या समोर आणी परिसरात नागरीकांचा मोठा जमाव या ठिकानी जमला होता ,घटनेमुळे जमलेल्या जमावास शांत करण्यात पोलीसांनी आपली महत्वाची भुमिका बजावली, यावेळी पोलीसांनी चोरटयांची दिशा कळावी या करिता जळगाव हुन तात्काळ श्वान पथकाला बोलाविण्यात आहे.

Protected Content