…म्हणून मी भाजपपासून फरकत घेतली : मुख्यमंत्री

uddhavthackeray modi

मुंबई (वृत्तसंस्था) धर्माचा उपयोग होळी पेटवून सत्ता मिळवणं असेल तर हे माझे उद्दीष्ट नाही. त्यामुळेच मी भाजपापासून फरकत घेतली. मला हिंदू राष्ट्र पाहिजे पण ते जळणार आणि अशांत हिंदू राष्ट्र अपेक्षित नाही. माझ्या वडिलांनी शिकवलेले हे हिंदुत्व नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीतून भाजपावर निशाणा साधला आहे.

 

जिथे भारतीय जनता पक्षाची (भाजप) सत्ता नाही तिथे अस्थिरता निर्माण करायची, दंगेधोपे घडवायचे आणि राज्य उलथून टाकायचे याला हे लोक हिंदुत्व म्हणतात का’, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्त्वावर जोरदार प्रहार केले. हे हिंदुत्व नसेल तर मी कुणापासून फारकत घेतली. हे माझे समविचारी आहेत काय? धर्माची होळी पेटवून सत्ता मिळवणे हे माझे हिंदुत्व नाही, अजिबात नाही. हे हिंदुराष्ट्र मी मानणार नाही. माझे हिंदु राष्ट्र, त्याची व्याख्या वेगळी आहे. माझ्या वडिलांनी शिकवलेले हे हिंदुत्व नाही. माणसे माणसाला मारतील हे हिंदुत्व नाही. हिंदुत्वालविषयी गैरसमज पसरवून किंवा दुरुपयोग करून सत्ता मिळवणे हे माझे हिंदुत्व नाही, असे टोल्यावर टोले हाणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या ‘हिंदुत्वावर’ जहाल टीका केली आहे.

Protected Content