खळबळजनक : बलात्काराचा गुन्हा मागे घेत नाही म्हणून पीडितेच्या मुलीला पेटवले !

अहमदनगर (वृत्तसंस्था) बलात्काराचा गुन्हा मागे घेत नाही म्हणून एका आरोपीने थेट पीडितेच्या १० वर्षीय मुलीला जिवंत पेटवल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. राजाराम तरटे आणि अमोल तरटे (पारनेर) अशी या दोन आरोपींची नावे आहेत.

 

अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील आदिवासी समाजातील २६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोपींवर आरोप आहे. याप्रकरणी पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, आरोपींनी पीडितेला हा गुन्हा मागे घेण्यास दबाव टाकायला सुरुवात केली. परंतू पीडितेने त्यांची मागणी मान्य केली नाही. त्यानंतर आरोपी मोटार सायकलवरुन आमच्या घरी आले. त्यावेळी त्यांनी तू बलात्काराची केस मागे घे, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी मुलगी अचानक बाहेर आली असता आरोपीने त्याच्या हातातील पेट्रोल टाकले आणि काडी पेटवून कली. त्यामुळे मुलगी गंभीर जखमी झाली. दरम्यान, आरोपींनी थेट तक्रादार महिलेच्या अल्पवयीन मुलीला जाळल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

Protected Content