भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डोक्यावर बंदूक लावून खंडणीची मागणी करणाऱ्या चौघांवर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील दत्त नगर हनुमान मंदीराजवळ जय मनोज जाधाव (वय-२२) रा. वाल्मिक नगर, जामनेर रोड, भुसावळ हा त्याचे मित्र अमर देविसिंग कसोटे, कुणाला राजू शिंदे, आकाश गणेश फबियानी यांच्यासोबत दत्त नगर येथून जात असतांना त्याठिकाणी निखील राजपूत रा. दत्त नगर, भुसावळ, अक्षय न्हावकर उर्फ थापा, अभिषेक शर्मा आणि पवन चौधरी तिघे रा. श्रीराम नगर, भुसावळ यांनी चौघांना रस्ता आडविला. यावेळी निखील राजपूत यांने हातात बंदूक काएून अमर कसोटे यांच्या डोक्याला लावून खंडणीची मागणी केली. तसेच इतरांनी जय जाधव यांच्या मित्रांना लोखंडी रॉडने मारहाण करून खिश्यातून पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी जय मनोज जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून निखील राजपूत रा. दत्त नगर, भुसावळ, अक्षय न्हावकर उर्फ थापा, अभिषेक शर्मा आणि पवन चौधरी तिघे रा. श्रीराम नगर, भुसावळ यांच्या विरोधात भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.