भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीशी १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने पळून जावून लग्न केले. एवढेच नव्हेत तर अत्याचारातून अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील एका गावात राहणारा १६ वर्षीय मुलाने पुणे जिल्ह्यातील एका गावात राहणारी १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत एका मंदीरात जावून लग्न केले. मुलगी ही अल्पवयीन असतांना तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातून अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात भडगाव पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे करीत आहे.