धरणगाव (प्रतिनिधी) अमळनेर येथील कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांना खबरदारीचा उपाय म्हणून तपासणीसाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना दिली आहे. दरम्यान, नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत संबंधित परिसरात निर्जंतुकीकरण करून घेतला. तसेच प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांशी संवाद ठेवून आहेत.
अमळनेरच्या कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात धरणगावातील पाच जण आल्याची माहिती प्रशासनाला मिळताच तातडीने त्या पाच जणांना जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी हलविण्यात आले. संबंधित परीसरात नगराध्यक्ष निलेश चौधरी यांना स्वत: उपस्थित राहून निर्जंतूकीकरण केल. तसेच सॅनिटाझरने फवारणी करून घेतली. दरम्यान, या घटनेमुळे शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, पालिका प्रशासन योग्य खबरदारी घेत असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे. मुख्याधिकारी जनार्दन पवार हे देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.