चाळीसगाव, प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील खरजाई येथील २४ वर्षीय तरुणाचा धावत्या रेल्वेखाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील खरजाई येथील मनोज गणेश मराठे (वय-२४ रा. खरजाई ता. चाळीसगाव) हा धावत्या रेल्वेखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार रोजी उघडकीस आली आहे. हा अपघात चाळीसगाव ते वाघळी रेल्वे स्थानक खांब क्र. ३३०/२४ दरम्यान घडला असून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना शैलेश पाटील हे करीत आहेत.