जळगाव प्रतिनिधी । विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना काल रात्री झालेल्या अपघातात थोडा मुका मार लागला असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी आज सकाळी डॉ. रणजीत चव्हाण यांच्या रूग्णालयात तपासणी करून घेतली.
काल रात्री माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रवीण दरेकर हे हरीभाऊ जावळे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यसााठी भालोद (ता. यावल) येथे गेले होते. यावेळी नशिराबाद जवळ त्यांच्या गाडीला किरकोळ अपघात झाला होता. यात त्यांना थोडी दुखापत झाली होती. या अनुषंगाने आज त्यांनी सकाळी स्वातंत्र्या चौकातील डॉ. रणजीत चव्हाण यांच्या हॉस्पीटलमध्ये जाऊन तपासणी करून घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी आपल्या डाव्या खांद्याच्या खाली बाजूस थोडा मुका मार लागला असून खबरदारीचा उपाय म्हणून आपण तपासणी करून घेतल्याची माहिती दिली. आपला एक्स-रे काढण्यात आला असून काळजी करण्यासारखे काहीही नसल्याचे ते म्हणाले.
खालील व्हिडीओत पहा प्रवीण दरेकर नेमके काय म्हणालेत ते !
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/305999714109076/?eid=ARCr7Dj2d-_dHjgdqKBkkAHKS8BQRg17jWGqz22DReB_tk39BeeTuWDX0x2dDMqGdqhtNDVW4xRawft5