नागपूर प्रतिनिधी– झोटिंग समितीच्या अहवालात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर कोणतेही दोषारोप नसल्याची माहिती आज उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भोसरी येथील जमीन प्रकरणी तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने झोटिंग समितीची स्थापना केलेली आहे’ मात्र आजवर या समितीचा अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. तथापि आज उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेमध्ये समितीच्या अहवालामध्ये एकनाथराव खडसे यांच्यावर कोणतेही दोषारोप करण्यात आलेले नाहीत अशी माहिती दिली. आजवर राज्य सरकारमधील कोणत्याही जबाबदार मंत्र्यांनी याबाबत वक्तव्य केले नव्हते या पार्श्वभूमीवर सुभाष देसाई यांच्या वक्तव्याला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे यामुळे आता एकनाथराव यांचे कशा पद्धतीने पुनर्वसन होते याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.