मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित आदरांजली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे ग्रंथालय अधीक्षक प्रा. सरोदे तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवे यांची विशेष उपस्थिती होती.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. हेमंत महाजन तसेच विद्यार्थी विकास महिला अधिकारी प्रा. डॉ. प्रतिभा ढाके राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. ताहिरा मीर, प्रा. डॉ. दीपक बावस्कर आणि प्रा. विजय डांगे यांनी केले. या अभिवादन कार्यक्रमाला महाविद्यालयातील माजी एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. कोळी, प्रा. गवळी, प्रा. डॉ. ठिंगळे, प्रा. सविता जावळे प्रा. डॉ. राजेंद्र चौधरी, प्रा. डॉ.चव्हाण, प्रा. खडसे, प्रा. हुसे, प्रा. डॉ. तोतावार, प्रा. पहुरकर, प्रा. डॉ. इस्माईल शेख, प्रा. खेडकर, प्रा.डॉ.सुरेखा चाटे, प्रा.डॉ.वाकोडे, प्रा.अमोल ढाके, प्रा.डॉ.ब़ढे, प्रा. डॉ. येवले, प्रा. डॉ.थोरात, भानुदास ब़ढे, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक निकिता राठोड, चेतन मोरे, हबीब तडवी, किरण माळी व इतर बहुसंख्य विद्यार्थी आणि प्राध्यापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.