मुंबई प्रतिनिधी । फडणवीस मुख्यमंत्री असतांना विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत भाजपचे एकनाथराव खडसेच नव्हे तर अन्य नेत्यांचेही फोन टॅप करण्यात आले होते अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गत सोमवारी फोन टॅपींग प्रकरणी दोन पोलीस अधिकार्यांची समिती नेमली असून याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, फडणवीस सरकारच्या काळात विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा फोनही टॅप करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली होती. यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच एकनाथराव खडसे यांच्या सोबत भाजपच्या अन्य नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याच्या तक्रारी आल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.